PM KISAN च्या 14 व्या हप्त्यासाठी करा E-KYC. E-KYC प्रक्रिया समजून घ्या सोप्या भाषेत. E-KYC नसल्याने खात्यावर जमा होईनात गरपिट व पावसाच्या नुकसनीचे पैसे.
सामाविष्ठ माहिती
E-KYC करण्याचे फायदे.
- राज्य शासन तसेच केंद्र शासन शेतकरी बांधवासाठी DBT अंतर्गत विविध योजना राबावत असते.
- DBT अंतर्गत योजनेची रक्कम ही थेट शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा होत असते.
- शासकीय योजनेतील भ्रष्टाचार अणि काळा बाजार बंद व्हावा म्हणून शासना मार्फत DBT ( Direct Benefit Transfer ) थेट लाभ हस्तांतरन मार्फत योजना राबवण्यात येत आहेत.
- तसेच शासन येथून पुढे सर्व योजना या DBT प्रणालीद्वारेच राबणार आहे. जसे सर्व शेतकारी बंधवाना PM KISAN चे येणारे हप्ते. स्प्रीन्कलर व ठिबक वर मिळणारे अनुदान हे DBT प्रणालीद्वारेच दिले जाते.
- E-KYC पोर्टल हे पिक विम्या साठी लिंक केले असल्याने या पुढे जर शेतकरी बांधवांची E-KYC पूर्ण नसेल तर शेतकरी बांधवाना पिकविम्याची रक्कम मिळणार नाही.
- त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर E-KYC करण्याचे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
E-KYC कशी करायची.
E-KYC ची प्रक्रिया ही मोबाइल अॅप वरुण तसेच pm.kisanan वेबसाइट वर जाऊनही करता येते. ही प्रक्रिया यंत्यांत सोपी असून 2 -3 मिनिटात संपूर्ण प्रक्रिया करता येते.
अ) E-KYC वेबसाइट वर करण्याची प्रक्रिया.
- वेबसाइटवर E-KYC करण्यासाठी प्रथम pmkisan च्या पुढील वेबसाइटवर क्लिक करून वेबसाइट उघडा www.pmkisan.gov.in.
- उजव्या बाजूला E-KYC वर क्लिक करा.
- नंतर आधार नंबर टाका.
- आधार नंबर ला लिंक असणारा मोबाइल नंबर टाका.
- मोबाइल नंबर वर आलेला OTP टाका.
- नंतर आधार कार्ड रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल वर आलेला OTP भरणे.
- सबमिट बटन वर क्लिक करावे.
- शेवटी “E-KYC has been successfully done” असा मेसेज आल्यावर E-KYC पूर्ण झाल्याचे समजावे.
ब) E-KYC मोबाइल अॅपमध्ये करण्याची प्रक्रिया.
- PM kisan हे अॅप डाउनलोड करावे. PMKisan चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
- अॅप डाउनलोड झाल्यावर अॅप मध्ये लॉगइन करा.
- Login Type मध्ये Beneficiary निवडा
- नंतर आधार नंबर टाका.
- आपल्या रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला 4 अंकी OTP टाका.
- आपल्या आधार क्रमांकाचे पहिले 6 अंक टाका.
- Beneficiary Dashboard वर जाऊन आपली वैयक्तिक माहिती भरून KYC पूर्ण करा.
क) E-KYC करताना घ्यायची काळजी.
- E-KYC करताना आपला आधार लिंक मोबाइल क्रमांक सोबत असावा.
- E-KYC करत असताना टाकावा लागणार मोबाइल क्रमांक हा आधार कार्डसही लिंक असावा.
- E-KYC चा नंबर बँक खात्याशी लिंक असावा.
- मोबाइल क्रमांक बँकेशी लिंक नसेल तर बँकेशी लवकरात लवकर लिंक करा अथवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढा.
का नाही जमा झाले गरपीटीचे पैसे ?
- मागच्या वर्षी म्हणजे खरीप 2022 व रब्बी 2022 मध्ये तसेच उन्हाळी पिकां मध्ये गारपिट व अती पावसामुळे राज्यभरातील विविध भागात शेतकरी बंधूच्या शेती मालाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
- या नंतर कृषि व महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून सरकारला अहवाल सादर केला होता. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईस 1500 कोटी रु मंजूर केले होते.
- काही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करत असताना शेतकार्यानी E-KYC केली नसल्याने अडचणी निर्माण झाल्या.
- त्यानंतर प्रशासनाने वारंवार सूचना देवूनही शेतकरी बांधवानी E-KYC केली नाही त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही.
- त्यामुळे प्रशासनामार्फत सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर E-KYC करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.